माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत; नागपूरमध्ये प्राथमिक उपचार, स्वतः माहिती देताना म्हणाले कि, …

442 0

नागपूर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज मॉर्निंग वॉकला गेले असताना दुखापत झाली आहे. थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाली असून नागपूरच्या मेयो रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

याविषयी स्वतः बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे . ते म्हणाले की, “आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करत असताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!