नाशिक : नाशिकच्या अभोना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याला काळीमा फासली आहे. नातवाने आपल्या आजी आजोबांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्यांची क्रूरतेने हत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि अवघ्या तीन तासांमध्ये तपासाची सूत्रे नातवाच्या दिशेने संकेत देत होती. पोलिसांनी या नराधम नातवाला ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी केली आहे. त्यानंतर या नातवाने कबूल केले आहे की, आजी आजोबाची हत्या ते दोघे खर्चासाठी पैसे देत नसल्याकारणाने केली आहे.
त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक आणि तपासा यंत्रणांच्या सहाय्याने पुरावे जमा केले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.