crime

गोळीबाराचा प्रयत्न फसला म्हणून कोयत्याने वार ; ससून रुग्णालयामध्ये हिंदू राष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरराववर प्राणघातक हल्ला

497 0

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आज सकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयामध्ये एका आरोपीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत. या आरोपीवरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , या आरोपीचे नाव तुषार हंबीरराव अस आहे. तुषार हंबीरराव हा हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष म्हणून देखील ओळखला जातो. त्याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला आहे. धक्कादायक म्हणजे भर ससून रुग्णालयामध्ये या आरोपींनी प्रथम गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. गोळीबाराचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी थेट आरोपी तुषार हंबीर याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये तुषार हंबीर हा गंभीर जखमी झाला आहे .

दरम्यान येथे उपस्थित पोलीस कर्मचारी अमोल बगाड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने ससूनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान तुषार हंबीरराव या आरोपीवर येरवडा कारागृहामध्ये देखील यापूर्वी हल्ला झाला होता अशी माहिती मिळते आहे. तुषार हंबीर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी असून सध्या येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!