PMPML बसमधे आगीची घटना; वेळेत आगीवर नियंत्रण, मोठी हानी टळली

271 0

पुणे : आज दिनांक २५•११•२०२२ रोजी दुपारी १२•०४ वाजता अप्पर डेपो बसस्थानक येथे बसला आग लागल्याची वर्दि प्राप्त होताच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी बसच्या पुढील बाजूस इंजिनच्या ठिकाणी पेट घेतल्याचे निदर्शनास येताच आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवली व धोका टाळला. सदर बस ही अप्पर डेपो ते स्वारगेट या मार्गाची असून बसचालक विश्वास किलजे यांनी प्राथमिक स्तरावर प्रसंगवधान राखत तिथे बसस्थानकावर उपलब्ध असलेले दोन अग्निरोधक उपकरण वापरुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. बसमधे कोणीही प्रवासी नव्हते. या घटनेत कोणीही जखमी नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत गंगाधाम अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी सुनिल नाईकनवरे, वाहनचालक निलेश कदम व जवान जितेंद्र कुंभार, आदिनाथ मोहिते यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

Attack on MLA Uday Samant : “ही तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया”…! सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेतून सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया..

Posted by - August 3, 2022 0
पुणे : मंगळवारी रात्री पुण्यामध्ये कात्रज परिसरात शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता . या…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Posted by - April 18, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी…

पर्यटकांसाठी खुशखबर..! सिंहगड ई -बस ट्रायलच्या फेऱ्यात

Posted by - March 15, 2022 0
ऑक्‍टोबर महिन्यापासून सिंहगडावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून…

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली…

“या आरोपामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्या…!” गिरीश महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे त्यांचे कुटुंबीय भावनिक

Posted by - November 22, 2022 0
जळगाव : एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *