‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

225 0

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात काल संध्याकाळी (शुक‘वार, २३ सप्टेंबर २०२२) पुणे शहर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी ६० ते ७० जणांचा बेकायदेशीर जमाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनधिकृतपणे जमा झाला होता. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे.

मुळीक म्हणाले, ‘कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणे आणि देशाच्या विविध भागांत अंतर्गत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या या जमावाचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते.’

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या सर्व कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुणे शहर भाजपच्या वतीने करीत आहोत.

Share This News

Related Post

RAIN UPDATE : सर आली धावून, रस्ते गेले वाहून ; पुण्यात पावसाची धुवाधार बॅटिंग ; पुढील ३ तासात ‘या’ शहरांना पावसाचा जोरदार तडाखा

Posted by - September 30, 2022 0
पुणे : पुण्यात पावसानं धुवाधार बॅटिंगला सुरुवात केली आहे. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून…
LokSabha

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : बहुप्रतिक्षित अशा लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज देशभरात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये मतदान होणार आहे.…
car Accsident

देवदर्शनाहून परतताना कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी अंत

Posted by - May 6, 2023 0
सांगली : सध्या राज्यातील अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगलीमध्ये असाच एक भीषण अपघात झाला आहे.…
Pune News

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेकडून दिल्लीत छापेमारी; 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी जप्त

Posted by - February 20, 2024 0
पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईंचा (Pune Crime) धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने…

MAHARASHTRA POLITICS : सत्ता संघर्षाचे प्रकरण आता घटनापिठाकडे ; 25 ऑगस्टला होणार पहिली सुनावणी

Posted by - August 23, 2022 0
MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद आता पाच सदस्यीय घटना पिठाकडे वर्ग करण्यात आला आहे . त्यामुळे या सत्ता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *