गणपती बाप्पा मोरया .. पुढच्या वर्षी लवकर या ! पुण्यातील गणेश विसर्जन घाटावर बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप ; पहा VIDEO

338 0

पुणे : आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर पुणे शहरातील दहा दिवसांच्या सर्व घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सकाळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरूवात झाली. अनेक वर्षांपासून परंपरेनुसार मंडई येथून पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती पाठोपाठ मानाच्या इतर चार गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरू झाली.

यापूर्वी प्रथमतः सकाळी मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे खासदार मा. गिरीशजी बापट, पुणे शहराध्यक्ष मा.जगदीशजी मुळीक, पर्वती मतदारसंघाच्या आमदार मा.माधुरीताई मिसाळ, मुरलीधर अण्णा मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे व इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून तसेच पालखीमध्ये विराजमान असलेल्या कसबा गणपतीला पुष्पहार व नारळ वाढवून आणि मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पालखीला खांदा देऊन या गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. या मानाच्या पाच गणपतींमध्ये कसबा गणपती पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग व केसरी वाडा गणपती बाप्पांचा समावेश आहे.

Share This News
error: Content is protected !!