पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान पालिका अधिकाऱ्यावर हल्ला, जेसीबीवर दगडफेक

670 0

पुणे- पुण्यात धानोरी भागात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर संतप्त नागरिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी नागरिकांनी थेट पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. तसेच कारवाईसाठी आलेल्या जेसीबीवर दगडफेक सुद्धा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यावर मनपा क्षेत्रात ज्या-ज्या ठिकाणी अतिक्रमण झालं आहे अशा सर्वच ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहरातील धानोरी परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिम आज सकाळी सुरू करण्यात आली.

यावेळी या अतिक्रमणाला स्थानिकांनी विरोध केला. इतकेच नाही तर महानगरपालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. तसेच कारवाईसाठी गेलेल्या जेसीबीवर सुद्धा दगडफेक करण्यात आली.

Share This News
error: Content is protected !!