दसरा मेळावा : शिंदे गटाच्या पोस्टर नंतर आता टीझर देखील रिलीज ; दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी वापरला बाळासाहेबांचा आवाज

502 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरुन जोरदार टोलवाटोलवी केली जाते आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.

दरम्यान शिंदे गटाच्या वतीने २ पोस्टर दसरा मेळाव्याचे रिलीझ करण्यात आले होते आता १ टिझर रिलीझ करण्यात आला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज वापरला आहे. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असे म्हणत या टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

दसऱ्या मेळाव्याची सध्या दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरु आहे. ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ आणि ‘बाळासाहेब तुमचा वाघ, म्हणून हिंदूत्वाला जाग’ अशा प्रकारचे दोन पोस्टर शिंदे गटाकडून मुंबईत लावण्यात आले आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!