” पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे विचार आठवले नाहीत का ? ” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

270 0

मुंबई : उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार यांच्यातील वाद रोजच नव्या रूपाने समोर येत असतात. शाब्दिक चिखल फेक सुरू असतानाच आता रामदास कदम यांनी पुन्हा एकदा थेट उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. यावेळी रामदास कदम म्हणाले की , ” शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असे सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात ? उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉगबाजी थांबवावी . सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का ? असा थेट सवाल रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसेना कोणाची हा वाद सुरूच आहे . उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यामध्ये या वादावर आता रामदास कदम यांनी मोठे भाष्य केले आहे . यावेळी ते म्हणाले की , ” उद्धव ठाकरेंना जे मिळाले ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळाले , आदित्य ठाकरेंना जे पक्षात सत्तेत स्थान मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून मिळाले असल्याचे सांगून पक्ष संघटना कोणी वाढवली ? ” असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे . तर पक्ष संघटना ही आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी वाढवली असे स्पष्ट मत रामदास कदम यांनी मांडले आहे .

Share This News

Related Post

Crime

घरजावई चिडले, सासूचे दात पाडले, पुण्यातील घटना

Posted by - May 24, 2023 0
घरजावयाबरोबर झालेल्या वादात जावयाने संतापाच्या भरात सासूचे दोन दात पाडले आणि सासूच्या तोंडावर गरम पाणी फेकल्याची घटना पुण्यात घडली. या…

भोर हादरलं ! विजेचा शॉक लागून बाप-लेकासह चौघांचा मृत्यू

Posted by - December 15, 2022 0
भोर : पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. विजेचा धक्का बसून एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाला. यात बाप-लेकासह…

पंजाबमध्ये ‘आप’ चा विजय ऐतिहासिक – संजय राऊत

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत…
Mandhardevi Temple

Mandhardevi Temple : मांढरदेवी मंदिर आज पासून 8 दिवस राहणार बंद

Posted by - September 21, 2023 0
सातारा : साताऱ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. वाई तालुक्यातील मांढरदेवी मंदिर (Mandhardevi Temple) आज पासून 28 सप्टेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासकीय कामकाजाचा धडाका ; 24 दिवसात तब्बल 538 शासन निर्णय

Posted by - July 26, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन 25 दिवस झाले आहेत . मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसताना देखील, प्रशासकीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *