PUNE CRIME कोल्हापूरचा ‘डॉक्टर डॉन’ इंदूरमधून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या जाळ्यात

382 0

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून एका व्यवसायिकाचे अपहरण झाले. या व्यवसायिकाकडून 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यासह बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणी या व्यवसायिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर गजा मारणे आणि टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणातील आणखीन एका सहआरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. या अपहरण प्रकरणात चंदगड मधील डॉक्टर डॉनचा सहभाग असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

मूळ नाव प्रकाश बांधीवडेकर याला खंडणी प्रकरणांमध्ये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा २, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोन पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे ,पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी ताब्यात घेतले आहे. बांधवाडकर याच्यावर खून, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत.

Share This News
error: Content is protected !!