राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

489 0

सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले अशी टीका मुंडे यांनी केली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले की, पूर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे. त्यांनी भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की त्यांच्यामागे ईडी लागली असेही धनंजय मुंडे म्हणाले. राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे 100 च्या वर आमदार येतील आणि राज्यात राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘ अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवताय , ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘ तात्या विंचूचा ओम फट स्वाहा करणार आहेत . राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे . लवकरच तुमचा थरथराट होणार.

Share This News
error: Content is protected !!