राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

393 0

सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले अशी टीका मुंडे यांनी केली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले की, पूर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे. त्यांनी भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की त्यांच्यामागे ईडी लागली असेही धनंजय मुंडे म्हणाले. राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे 100 च्या वर आमदार येतील आणि राज्यात राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘ अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवताय , ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘ तात्या विंचूचा ओम फट स्वाहा करणार आहेत . राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे . लवकरच तुमचा थरथराट होणार.

Share This News

Related Post

मोठी बातमी! उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Posted by - June 29, 2022 0
मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे जाहीर…

कररचनेत बदल नाही… अर्थमंत्र्यांची घोषणा.. अशा आहेत केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

Posted by - February 1, 2022 0
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज २०२२-२३ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. सर्वसामान्य करदात्यांसाठी मात्र या अर्थसंकल्पात कोणतीही…
Pune Metro

Pune Metro : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोच्या वेळेत एकदिवसीय बदल

Posted by - November 9, 2023 0
पुणे : रविवार, दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल.…

मोठा निर्णय : राज्यातील ‘त्या’ 2 महत्त्वाच्या केसेस CBI कडे वर्ग करण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे निर्देश ; पोलीस अधिकारी आणि काही मोठे राजकीय नेते CBI च्या रडारवर

Posted by - July 23, 2022 0
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. तर अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील दोन महत्त्वाच्या…

#BEAUTY TIPS : चेहऱ्यावरील मुरुमांपासून मिळेल सहज सुटका, फक्त वापरा हे सोपे होममेड फेस पॅक

Posted by - March 20, 2023 0
#BEAUTY TIPS : मुरुम आणि पिंपल्स ही एक समस्या आहे जी केवळ चेहऱ्यावरच नाही तर मनावरही परिणाम करते. पिंपल्समुळे अनेकांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *