राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर पुन्हा बदनामीकारक मजकूर; पुण्यातील महिलेविरोधात फिर्याद दाखल

477 0

पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सौदामिनी हॅन्डलूम्स या दुकानाच्या संचालिका अनघा घैसास या महिलेने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध सामाजिक माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीवरून टीका केली आहे. याप्रकरणी शरद पवार यांची बदनामी करून आमच्या भावना दुखावल्या अशा आशयाचे पत्र आज माझी महापौर अंकुश काकडे आणि माझी अध्यक्ष स्थायी समिती पुणे महानगरपालिका श्रीकांत शिरोळे यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर यांना दिले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेवर प्रचलित कायद्यानुसार योग्य तो फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद देण्यात आली आहे.

पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील सौदामिनी हॅन्डलूम्स या दुकानाच्या संचालिका अनघा घैसास या महिलेने शरद पवार यांच्या विरूद्ध सामाजिक माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीवरून टीका करून शरदर पवार यांची प्रछन्न बदनामी करून आमच्या भावना दुखावल्या आहेत. सदर लिखाणात वापरण्यात आलेली भाषा अत्यंत असभ्य असून, अश्या प्रकारचे लिखाण करून अनघा घैसास नांवाचे महिलेने भारतीय दंड विधान कायद्याचे अनेक तरतुदींचा भंग केला आहे. तरी सदर बदनामीकारक मजकूर सामाजिक माध्यमातून प्रसारीत केल्याबाबत अनघा घैसास यांचे विरूद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य तो फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!