पुणे : आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. परंतु तो पुढे ढकलण्यात आला, राज्याला आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले असून या विस्तारामध्ये भाजपच्या तीन ते चार महिला आमदारांकडे मंत्रिपद येऊ शकते. असे सूचक वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले आहे. आज पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
चित्र वाघ म्हणाल्या की, “येणाऱ्या दिवसात मंत्रिमंडळात एक नाही तर तीन-चार महिलांना स्थान द्यावे अशी माझी मागणी आहे. सध्या विधानसभेत सगळ्यात जास्त भाजपच्या आमदार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये ही भाजपने आपल्या कोट्यातून महिलेला संधी दिली त्यामुळे महिला आमदारांना भविष्यात नक्की संधी दिली जाईल अशी अपेक्षा चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासह एखाद्या महिला आमदाराला मंत्रिपद द्यायचं असेल तर डोळे झाकून महिला व बालकल्याण मंत्रालय देऊन टाकतात, मला असं वाटतं की कधीतरी पुरुषांनी पण हे खातं बघावं, आम्हाला किती अडचणी येतात हे पहावं.
सध्या मंगल प्रकाश लोढा यांच्याकडे हे तात्पुरते खाते देण्यात आले असून, त्यामुळे त्यांना त्याची कल्पना येईल. सगळ्या आमदार अनुभवी महिला आहेत. पक्षाकडे एकापेक्षा एक सगळ्याजणी महिला आमदार आहेत. येणाऱ्या दिवसात मंत्रिमंडळ विस्तारात त्या दिसतील असे यावेळी चित्रा वाघ म्हणाले आहेत.