श्रीमंत दगडूशेठ मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा, बाप्पाला घडला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

475 0

पुणे- धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणा-या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि ‘जय गणेश…जय गणेश’ चा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभविला. सकाळी ८ वाजून २५ मिनीटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी स्पर्श केला.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, “गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा दरवर्षी अनुभवायला मिळतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा गणेशजयंतीनंतर एका आठवडयामध्येच अनुभवता आला.

 

Share This News

Related Post

‘तुमच्या पक्षनेतृत्वाने राष्ट्रवादीच्या गाडीला लावून आपलं टायर फोडून घेतलंय’ मनसेला स्टेपनी म्हणणाऱ्या अंधारेंचा मनसेने घेतला समाचार

Posted by - November 22, 2022 0
पुणे : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. या…

महाराष्ट्र केसरीच्या पंचाना धमकावणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Posted by - January 16, 2023 0
10 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेनंतर एक मोठी बातमी समोर येते…
Bank Holiday

Bank Holiday : उद्यापासून सलग 6 दिवस बँका राहणार बंद

Posted by - November 9, 2023 0
दिवाळीचा सण आला असून, संपूर्ण देशभरात यानिमित्ताने उत्साह आहे. बाजारांमध्ये खरेदीसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. घराची सजावट, फराळ…

Irrigation Scam Case : मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ ; ” लवकरच राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार ” …! रोख अजित पवारांकडे ?

Posted by - August 17, 2022 0
मुंबई : मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे . सिंचन घोटाळा संदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळासह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *