Cyclone

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने धारण केले रौद्र रुप; 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर धडकणार

630 0

देशभरात बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) परिणाम पाहायला मिळत आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण केलं आहे. या चक्रीवादळामुळे गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) अलर्ट जारी करण्यात आला आहे. मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या भागातील जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग 150 किमी प्रतितास आहे. हे चक्रीवादळ आता वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत आहे. यासाठी किनारपट्टी भागात तटरक्षक आणि एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहेत.

हवामान विभागाचे महासंचालक एम. महापात्रा यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनला संध्याकाळी धडकण्याचा अंदाज आहे. कच्छ भागात याचा सर्वाधिक प्रभाव पडेल.15 जूनला चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग किनाऱ्याजवळ 125-135 किमी प्रतितास असेल. सध्या अरबी समुद्रातील हे वादळ 8 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेकडे सरकत आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह महाराष्ट्रात दिसून येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. किनारपट्टी भागातील सुमारे 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या चाकीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!