Farmers

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ! राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

722 0

मुंबई : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली असल्याने बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25% अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्य स्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?
नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम – 155.74 कोटी)
जळगाव – 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)
अहमदनगर – 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)
सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)
सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)
सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)
बीड – 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)
बुलडाणा – 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)
धाराशिव – 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)
अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)
कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)
जालना – 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)
परभणी – 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)
नागपूर – 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)
लातूर – 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)
अमरावती – 10,265 (रक्कम – 8 लाख)
एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)

Share This News

Related Post

kotwali police

अहमदनगर हादरलं! बायकोची निर्घृणपणे हत्या करून आरोपीची आत्महत्या

Posted by - May 4, 2023 0
अहमदनगर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपीने पत्नीची निर्घृणपणे…

रवींद्र साळेगावकरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची मागणी

Posted by - April 14, 2023 0
भाजपचा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांचा तपास करून त्याच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे…

कोळसा संकटामुळे रेल्वेने पुढील 20 दिवस रद्द केल्या 1100 गाड्या

Posted by - May 5, 2022 0
नवी दिल्ली- एकीकडे कडक उन्हामुळे देशभरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर दुसरीकडे देशात कोळशाची प्रचंड प्रमाणात टंचाई निर्माण…

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून राजकारण (व्हिडिओ)

Posted by - March 4, 2022 0
सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्गीय आयोगाचा आंतरिम अहवाल फेटाळून लावल्यानंतर आता अर्थसंकल्प अधिवेशनात जोरदार घामासांग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेत…
Congress

Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

Posted by - March 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 46 उमेदवारांची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *