#CRIME NEWS : मावळमध्ये किरकोळ कारणावरून गावगुंडांची कुटुंबाला फावडे आणि दगडाने बेदम मारहाण; व्हिडिओ झाला व्हायरल !

1242 0

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होते आहे. किरकोळ कारणातून गाव गुंडांनी या गावातील कदम कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

#CRIME NEWS : दारूच्या नशेत नातवाने 90 वर्षाच्या आजीला मारहाण करून संपवलं; वडिलांना उचलून जमिनीवर आपटलं, दारुने कुटुंब उध्वस्त केलं !

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मावळ येथील शिवली या गावामध्ये ही घटना घडली आहे. कदम हे कुटुंब अनेक वर्षापासून शिवली गावात वास्तव्यास असून त्यांच्या येजा करण्याच्या रस्त्यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यावरूनच कदम यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. तसेच हा ये -जाण्याचा रस्ता खोदल्यामुळे गावातील अडकर कुटुंबाने या कदम कुटुंबीयांना दगड आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

#ACCIDENT : पुण्याजवळ मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; 12 वाहनांना जोरदार धडक !

याप्रकरणी कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून नितेश अडकर, रामभाऊ आडकर, देविदास आडकर, तानाजी आडकर, संगीता आडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!