अहमदाबाद मधील मराठी कुटुंबातील हत्येचे गूढ उलगडले, 48 तासांत आरोपीला अटक

367 0

अहमदाबाद – अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबातील चौघांची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून आरोपीला अवघ्या 48 तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. विनोद याने आपली पत्नी, दोन अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची चार दिवसांपूर्वी हत्या केल्याचा आरोप आहे. अहमदाबादच्या ओढव भागात दिव्यप्रभा सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंधी येत होती. सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी घरात डोकावण्याचा प्रयत्न केला पण घराला बाहेर कुलूप होतं. स्थानिकांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून प्रवेश केला असता महिला, तिची आजी आणि 15 आणि 17 वर्षांची दोन मुलं यांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले.

हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या 48 तासांत अहमदाबाद क्राईम ब्रांचने महिलेचा पती विनोद गायकवाडला हत्या प्रकरणातील संशयित म्हणून अटक केली आहे. हत्या करुन आधी तो अहमदाबादहून सुरत, तर तिथून इंदौरला पळून गेला होता. विनोद याने हत्येचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. मात्र कुठलाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जिवंत ठेवायचा नसल्याने त्याने कुटुंबातील चौघांचीही हत्या केल्याचं सांगितलं.

विनोद अहमदाबादच्या ओढव भागात टेम्पो चालवायचा. गेल्या काही काळापासून त्याची आर्थिक स्थिती बरी नव्हती. त्यावरुन विनोद आणि त्याच्या पत्नीत वाद होत असत. आजेसासूवर त्याने याआधीही हल्ला केला होता, मात्र नातीची अवस्था पाहून आजीने याविषयी तक्रार केली नाही.

Share This News

Related Post

Ajinkya Kadam

Ajinkya Kadam : बॉडी बिल्डर अजिंक्य कदमचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 5, 2023 0
नालासोपारा : मुबईतील नालासोपारा याठिकाणी अजिंक्य कदम (Ajinkya Kadam) या 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.…

विवाहानंतर पॅनकार्डमध्ये नवीन नाव आणि पत्ता अपडेट करणे गरजेचे; अन्यथा…

Posted by - October 29, 2022 0
विवाहानंतर मुलीचे घर बदलते आणि आडनावही. अर्थात आडनाव बदलणे आवश्यक नाही, परंतु विवाहानंतर आडनावात बदल होत असेल तर पॅनकार्डमध्ये अपडेट…

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात

Posted by - January 30, 2022 0
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.…

सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, बैठकीत सहभागी अनेक नेत्यांनाही लागण

Posted by - June 2, 2022 0
नवी दिल्ली- सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. रणदीप सुरजेवाला…
Firing In Parbhani

Firing In Parbhani : खळबळजनक ! पूर्णा कॉलेज कॅम्पसमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या; परभणी हादरलं

Posted by - December 8, 2023 0
परभणी : परभणीमधून (Firing In Parbhani) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये भर दिवसा गोळीबार करण्यात आला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *