ट्रक चालकाला लुबाडणाऱ्या टोळीचा कसारा घाटात थरारक पाठलाग, एका दरोडेखोराला अटक

688 0

इगतपुरी- बंद पडलेल्या ट्रकच्या चालकाला मारहाण करुन त्याला लुटणाऱ्या टोळीपैकी एकाला पोलिसांनी फिल्मी स्टाइल पाठलागानंतर पकडले. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कसारा घाटात घडली.

विजय रामदास ढमाळे असे पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांचे नाव आहे. या घटनेत पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड जखमी झाले आहेत.

नाशिक दिशेहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रक (एम एच 40 बी जी 6165) बंद पडला होता. रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाट उतरत असताना गाडीचा पाटा तुटल्यामुळे महामार्ग पोलिसांच्या मदतीने चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून ठेवला होता. रात्रीच्या वेळी गॅरेज उपलब्ध होत असल्याने महामार्ग पोलिसांनी ट्रक चालकाला मोबाईल नंबर दिला आणि ते गस्तीसाठी निघून गेले.

पहाटे साडेचारच्या सुमारास पल्सर बाईकवर तिघे जण आले. पूर्ण काळे कपडे परिधान केलेल्या या तिघा तरुणांनी गाडीतील चालकास आवाज देत उठवलं. दादागिरी करत ट्रकवर दगडफेक केली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत महामार्ग पोलिसांना कॉल केला. मात्र तोपर्यंत तिघा दरोडेखोरांनी ट्रकमध्ये चढून ट्रक चालक विकी खोब्रागडे आणि क्लिनर निधी वासनिक यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतले.

त्याच दरम्यान महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे आणि संजय नंदन हे तिथे पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच लुटारुंनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जंगलात पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. तिघा दरोडेखोरांपैकी मुख्य सूत्रधार असलेल्या विजय रामदास ढमाळे (रा. इगतपुरी) याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवले असता ढमाळे याने गायकवाड यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले. अन्य कर्मचाऱ्यांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला कसारा पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपींकडे असलेली दुचाकी MH 15 HB 1075 देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Share This News

Related Post

Breaking News ! पुण्यात खराडी परिसरातील महालक्ष्मी लॉन्स समोरील दुकानांना भीषण आग

Posted by - April 20, 2022 0
पुणे- पुण्यात खराडी परिसरातील महालक्ष्मी लॉन्स समोरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या…

“एरोमॉडेलिंगच्या प्रात्यक्षिकामुळे बालपण झालेे जागृत…!” पीसीएमसी आयुक्त शेखर सिंग यांचे भावूक उद्गार

Posted by - December 6, 2022 0
            योजक तर्फे एरोमॉडेलिंग शो मध्ये ३ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लुटला आनंद पिंपरी : “विमानांचे…
Raigad News

Raigad News : मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले अन्.. बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

Posted by - October 1, 2023 0
रायगड : विजांच्या कडकडाटासह कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणा हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रायगडमधील (Raigad…

ऊर्जा विभागातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

Posted by - April 5, 2022 0
शिर्डी- ऊर्जा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पालक या नात्याने पूर्ण काळजी घेणार असून ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांना…

CHITRA WAGH : नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणानंतर राज्यातील सर्व आधार आश्रमांचं ऑडिट व्हावं

Posted by - November 25, 2022 0
मुंबई : नाशिक जिल्ह्यातल्या एका आधार आश्रमातील संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली.या घटनेनंतर.. राज्यातील सर्व आधार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *