विमानातच जुंपला वाद ; सहप्रवाशाला शर्ट काढून लगावली कानशिलात ; वाचा काय आहे प्रकरण

792 0

काही दिवसापूर्वी विमानामध्ये सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा प्रकार घडला होता. तर आता विमानामध्येच दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्ये एका प्रवाशांन अंगावरचे कपडे काढून सहप्रवाशाला कानशिलात लगावली आहे.

सीटसाठी किंवा सीटवर बसायला जाताना होणाऱ्या कोणत्याही तसदीमुळे वाद होण्यासारखं खरं तर विमानामध्ये काहीही नाही. या दोन प्रवाशांमध्ये नक्की वाद कशामुळे सुरू झाला आणि तो एवढा विकोपाला कशाने गेला हे समजू शकले नाही. परंतु हे भांडण इतकं जोरदार झालं कि एका प्रवाशांन थेट अंगावरचा शर्ट काढून हाणामारी केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

Share This News
error: Content is protected !!