IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट? फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

234 0

पुणे : पुणे पोलिसांनी एका प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविषयी न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केला. रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप झाला होता.

पुणे पोलिसांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील आरोपाबाबत न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली. पोलिसांनी सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयानं स्वीकारल्यास प्रकरण बंद केले जातं. एखादा गुन्हा ‘चुकीनं’ नोंदवला गेला असेल किंवा तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याचं आढळून आलं असेल तर क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला जातो.

रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फेब्रुवारी 2022 मध्ये भारतीय टेलिग्राफ कायदा कलम 26 अंतर्गत येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील उद्धव ठाकरे सरकार सत्तेत होतं. शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात नाना पटोले यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

Share This News

Related Post

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोले यांची राष्ट्रवादीवर टीका

Posted by - May 11, 2022 0
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असं सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला,…

#HEALTH WEALTH : दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी टिप्स; चांगले आणि दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर या सवयी ताबडतोब अंगीकारा

Posted by - March 25, 2023 0
आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर आणि मन निरोगी असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी निरोगी आहार, व्यायाम आणि निरोगी सवयी पाळणे आवश्यक…

रवी राणा बच्चू कडू यांच्यातील वाद मिटविण्याची शक्यता

Posted by - October 30, 2022 0
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके…

” ‘ती’ बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची..!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Posted by - August 18, 2022 0
रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर एक बोट आढळून आली . सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छीमारांचीच असावी असे वाटत असताना…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतचा चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता?

Posted by - August 23, 2023 0
मुंबई : अवघ्या काही तासांत भारत एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *