आपला महाराष्ट्रठळक बातम्याव्हिडिओ

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी पत्नीसह शेतीकामात व्यस्त

सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या सातारा येथील दरे या त्यांच्या मूळ गावी विश्रांतीसाठी आलेले आहेत. दोन दिवसांचा त्यांचा हा दरेगावचा दौरा असून, या गावी आल्यानंतर ते नेहमीप्रमाणेच शेतीचा आनंद घेताना दिसत आहेत. या वेळी ते लोकांच्या गर्दीतून थोडे लांब जाऊन शेती करण्यात रमल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? त्या नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जेव्हा विश्रांतीला त्यांच्या गावात येतात तेव्हा नेहमीच ते शेती करण्याचा आनंद घेत असतात या वेळी सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या पत्नी दोघानी सुद्धा नवीन झाडे लावली तसेच केळीची बाग देखील तयार केली आहे. त्यामध्ये केळीची रोप लावत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी दिसत आहेत.

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

या वेळी त्यांच्या सोबत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) सुद्धा दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी 2 दिवस मुक्कामी आले असून कोरेगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांची दरे गावी जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार महेश शिंदे यांचे सारथ्य खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.यावेळी दोघांनी शेतीची पाहणी करत जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली.