#MUMBAI : चिकन पुलाव पडला चांगलाच महागात; पुलाव कच्चा होता म्हणून हॉटेल मालकाशी झाला वाद, मुंबईत तुफान राडा…

1081 0

मुंबई : मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी तीन मित्र गेले होते. यावेळी या मित्रांनी चिकन पुलाव मागवला होता. पण हा पुलाव कच्चा होता. म्हणून या मित्रांनी हॉटेलच्या मालकाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर मालक आणि या तिघा मित्रांमध्ये वाद सुरू झाला.

हा वाद एवढा विकोपाला गेला की, हॉटेल चालकांन या तिघा तरुणांना थेट लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. एवढ्यावरच हा वाद थांबला नाही तर चाकूने पाठीवर आणि खांद्यावर देखील वार करण्यात आले.

याप्रकरणी तरुणांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आंबोली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात 324, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल समद असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी हॉटेल मालकाचे नाव आहे.

Share This News
error: Content is protected !!