मुंबई : अखेर अनेक नावांच्या स्पर्धेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार यासाठी अनेकांच्या नावांची चर्चा होती . यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राम शिंदे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू होती . अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन 200 आणि 45 चा नारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये 200 जागा तर लोकसभा निवडणुकीमध्ये 45 जिंकण्याचा आमचं मिशन असल्याचा त्यांनी म्हटले , आणि ते मिशन आम्ही पूर्ण करणारच अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे आशिष शेलार यांची दुसऱ्यांदा मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली भाजप मुंबई अध्यक्ष मंगल लोढा यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे त्यामुळे त्यांचं पद रिक्त होतं त्यामुळे येत्या महापालिका निवडणुका विचारात घेता शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे