शाई फेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, “हिम्मत असेल तर समोर या, मी कुणाला घाबरत नाही ! वाचा सविस्तर

508 0

पिंपरी : पिंपरीमध्ये आज समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. महापुरुषांवरील अपमान जनक वक्तव्याचे पडसाद आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाही फेक झाल्यानंतर पिंपरीतील वातावरण तणावाचे झाले आहे.

या घटनेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणे त्याचं तीन-तीन वेळा स्पष्टीकरण दिल्यानंतरही…, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा भ्याडपणा ! अरे हिम्मत असेल तर समोर या, चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करू असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

BIG BREAKING : पिंपरीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक; महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्याचे पडसाद

अरे काय चाललंय ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात जे जपलं की एखाद्या गोष्टीचा विरोध हा लोकशाही मार्गाने करायचा, पण ही झुंडशाही आहे ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही, या शाही फेकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. पण झुंडशाही चालणार नाही. आज समजा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छूट दिली असती तर हे केवढ्यात पडलं असतं. पण आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!