चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

672 0

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकून उलटली. या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथून मध्य प्रदेशमधील खरगोनकडे जाणाऱ्या सुरत – खरगोन बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील १३२ केवी सब स्टेशनजवळ डिव्हायडरला धडकून बस उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शहादा शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!