बुलेटराजांच्या पुंगळ्या टाइट ! कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

294 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवत बुलेटचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल 195 बुलेटचालकांकडून 2 लाखांचा दंड वसूल केला.

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमे अंतर्गत एकाच दिवशी 195 बुलेटचालकांना दंड आकारण्यात आला. त्यांच्याकडून एकाच दिवसात तब्बल 2 लाख रुपये दंड वसूल केला. वकर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांविरोधात ही धडक मोहीम सुरू आहे. यापुढं देखील ही विशेष मोहीम राबवली जाणार असल्याच वाहतूक विभागानं स्पष्ट केलं.

Share This News
error: Content is protected !!