पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे पुण्यात शिवसेना जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या गोळीबाराविषयी टॉप न्यूजचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख यांच्याशी संवाद साधला आहे. आगामी निवडणुका पाहता राजकीय वैमानस्यातून हा हल्ला झाला असावा, पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले आहे. यापुढेही असेच काम करत राहणार अशी प्रतिक्रिया यावेळी शेख यांनी टॉप न्यूज शी बोलताना व्यक्त केली आहे.