BREAKING NEWS : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल मधील घरावर आणि पुण्यातील कार्यालयांवर ईडीचे छापे

277 0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि पुण्यातील कार्यालयावर आज पहाटेपासूनच छापेमारी सुरू केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागल मधील घरावर त्याचबरोबर पुण्यातील कार्यालयावर छापे टाकण्यात येत आहेत. आप्पासाहेब नलवडे कारखान्यामधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ईडीनं छापेमारी सुरू केली असून, मुश्रीफ यांनी यापूर्वी देखील त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले होते. तथापि गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्यावर ईडीचे छापे पडणार असे वक्तव्य देखील केले होते.

काय आहे प्रकरण ?

कोल्हापुरातील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणात कारखान्यातील 98% पैसा हा मनी लॉण्डरिंगच्या माध्यमातून जमवण्यात आला असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला असून, या घोटाळ्यामध्ये मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांचा देखील सहभाग असल्याचं भाजप नेते किरीट समय्या यांनी म्हटल आहे.

आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा काही वर्षांपूर्वी अवसायनात काढण्यात आला होता. हा कारखाना दि बिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला होता. ही कंपनी मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्या मालकीची असून, या व्यवहारासाठी कोलकत्ता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाते देखील तयार करण्यात आले होते. या बोगस खात्यामध्ये टाकलेले पैसे व मतीन मंगोली यांच्या बिस्की इंडिया कंपनीत वळते करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Share This News
error: Content is protected !!