निर्माता बोनी कपूर यांची ३९ लाखांची चांदीची भांडी जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

1234 0

बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांना निवडक आयोगाने धक्का दिला आहे. बोनी कपूर यांची तब्बल ६६ किलो चांदीची भांडी जप्त केली आहेत. या भांड्यांची किंमत ३९ लाख रुपये आहे. कर्नाटकच्या दावणगिरी चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली आहे.

बीएमडब्ल्यू कारमधून ही चांदीची भांडी नेली जात असताना ही कारवाई करण्यात आली. पाच बॉक्समध्ये ही भांडी चेन्नईहून मुंबईला नेली जात होती. भांडी पाच पेट्यांमध्ये ठेवली होती. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चांदीची वाटी, चमचे, पाण्याचे मग आणि प्लेट जप्त केले आहे.
योग्य कागदपत्रं सादर करण्यात न आल्याने सर्व भांडी जप्त करण्यात आली. याप्रकरणी कारचा चालक सुलतान खान आणि प्रवासी हरीसिंग याच्याविरुद्ध दावणगेरे ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटक राज्यात सध्या विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कसून तपासणी सुरु केली आहे. तपासादरम्यान ही कार Bayview Projects Pvt Ltd यांच्या नावे नोंद असल्याची माहिती मिळाली. ही कंपनी बोनी कपूर यांच्या मालकीची आहे. पोलिसांनी चौकशी केली असता हरि सिंग याने ही भांडी बोनी कपूर यांच्या मालकीची असल्याची कबुली दिली.

या भांड्याची योग्य कागदपत्रं नसल्याने अधिकाऱ्यांनी सर्व भांडी जप्त केली आहेत. दरम्यान, या भांड्यांचा बोनी कपूर यांच्या कुटुंबीयांशी काही संबंध आहे का याचा तपास अधिकारी करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!