प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला पोलीस उपनिरीक्षकाने दिली जीवे मारण्याची धमकी

14204 0

अनैतिक संबंधावरुन एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना घडली.

प्रवीण नागेश जर्दे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जर्दे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण जर्दे हा सध्या कोर्ट आवार येथे नियुक्तीला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दे याचे फिर्यादी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. तिने हे संबंध सोडून द्यावेत, यासाठी फिर्यादी तिला सांगत होता. तिने हे प्रवीण जर्दे याला सांगितले. त्यावरुन १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जर्दे हा त्यांच्या घरात शिरला. त्याने फिर्यादी, त्यांची आई व मुलांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली.

यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे. तसेच त्याने कमरेच्या पिस्तुलाला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी व कुटुंबीय घाबरून गेले. त्यांनी कोथरुड पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी जरंडी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Related Post

मुलीला कुत्रा चावला म्हणून महिलेने कुत्र्याच्या दोन पिल्लाना केलं ठार, पुण्यातील घटना

Posted by - April 12, 2022 0
पुणे- मुलीला कुत्रा चावल्याच्या रागातून एका महिलेने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारलं. एवढंच नाहीतर सोसायटीतील एकाही कुत्र्याला…

Breaking News रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिरात आलेले 25 भाविक कोसळले विहिरीत

Posted by - March 30, 2023 0
आज रामनवमीचा सण सर्वत्र उत्साहात सुरु आहे.अशातच मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीवरील छत तुटल्यामुळे मंदिरात…

रोडरोमिओ मुलींना पाठवायचा अश्लील मेसेज आणि व्हिडिओ; नंबर ब्लॉक करूनही पुन्हा करायचा असे कृत्य… ! मुलींनं शिकवला चांगलाच धडा

Posted by - January 21, 2023 0
मुंबई : आजकालचे रोडरोमिओ मुलींना त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. रस्त्यावरून जात असताना टिंगलटवाळी करणे, याहून आता वर मजल…

पुण्यातील RTO कार्यालयासमोर रिक्षा चालकांकडून चक्का जाम ! CNG चा दर कमी करण्याची मागणी

Posted by - August 8, 2022 0
पुणे : राज्यात सगळ्याच गोष्टी महागल्या आहेत. त्याचप्रमाणे सीएनजीचा दर प्रति किलो 91 रुपये झाला आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसत…

#PUNE : अखेर फुरसुंगी आणि उरळी देवाची नगरपरिषद होण्याचा मार्ग मोकळा; वाचा सविस्तर

Posted by - February 9, 2023 0
पुणे : फुरसुंगी आणि उरळी देवाची ही महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *