मोठी बातमी : केंद्राकडून शिंदे गटातील ‘या’ खासदारावर मोठी जबाबदारी

503 0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच शिंदे गटातील खासदाराला मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे केंद्रात आता शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून, संसदेच्या स्थायी समितीमध्ये महत्त्वाचे बदल मोदी सरकारकडून करण्यात आले आहेत.

See the source image

काही दिवसांपूर्वीच प्रतापराव जाधव हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. सचिन वाजे 100 कोटी रुपयांची वसुली करून मातोश्रीवर पोहोचवत होता. असा खळबळ जनक आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता. तर काही तासानंतर आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं होतं. दरम्यान मोदी सरकारने त्यांच्यावर आता माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Share This News
error: Content is protected !!