मोठी बातमी : माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी ; पैसे न दिल्यास …

577 0

पुणे : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी संदीप पिरगोंडा पाटील आणि शेखर गजानन ताकवणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पौड रस्त्यावर फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करुन त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली.

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ३ कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी पाटील आणि ताकवणे यांनी दिली. या प्रकरणी आरोपी पाटील, ताकवणे विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!