मालेगाव: स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं दैवत असून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भर सभेत खडसावल्याचं पाहायला मिळालं ते मालेगावात जाहीर सभेत बोलत होते.
गद्दारांनी नाव चिन्ह चोरले पण त्यांच्या नशिबात जिवाभावाच्या माणसांचं प्रेम तुमच्या नशिबात नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व शिंदे गटातील 40 आमदारांवर तोफ डागली
याच सभेत भारतीय जनता पक्षावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले मिंधे गटाला ४८ जागाच देणार. बावनकुळेंनी नावाप्रमाणे तरी जागा द्यावी. भाजपने जाहीर करावे मिंधेंना नेते म्हणून निवडणुक लढणार का? तुमची ५२ काय १५२ कुळ आली तरी ठाकरेंपासून तुम्ही दूर नेऊ शकत नाही. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुक लढवा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो पण निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा.