मोठी बातमी : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपानं खातं खोललं ; भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

701 0

कोकण : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपानं खातं खोललं आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी आहेत.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान झालं होत. आज या ५ जागांसाठीचा निकाल लागणार आहे. विधानपरिषदेच्या या पाच जागामध्ये तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली असून कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपानं खातं खोललं आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी आहेत.

या निवडणुकीमध्ये निवडणुकीसाठी 5 जागांसाठी 83 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या 83 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!