#भारत जोडो यात्रा : राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल; KGF चित्रपटातील…

411 0

तेलंगणा : भारत जोडो यात्रा ही कन्याकुमारी ते श्रीनगर अशी झंझावाती सध्या सुरू आहे रोजच राहुल गांधी यांच्या या यात्रेविषयी नवीन बातम्या येत असतात पण सध्या त्यांची ही यात्रा चर्चेत आली आहे ते एका वेगळ्याच कारणामुळे विशेष म्हणजे जबरदस्त हिट ठरलेला की जीएफ चित्रपटाच्या संगीत निर्मात्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या दोन नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

कारण असे झाले आहे की या भारत जोडो यात्रा दरम्यान वेगवेगळे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत समर्थक या व्हिडिओला केजीएफ चित्रपटातील संगीताची साथ देत आहेत त्यामुळेच आता राहुल गांधी यांच्यासह सुप्रिया श्रीनेत आणि जयराम रमेश यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमआरटी म्युझिक कंपनीने हा गुन्हा दाखल केला आहे

Share This News
error: Content is protected !!