पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, संभाजीनगरमधील वेताळवाडी किल्ल्यावरील घटना

1153 0

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात अजिंठ्याच्या डोंगर रांगेत असलेल्या वेताळवाडी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली.

अशोक मोरे रा. जरंडी वय 45 वर्षे, राजेंद्र पाटील रा.जरंडी वय 43 वर्षे, मनोहर पाटणकर रा.शेंदुरणी, जि जळगाव, वय 29 वर्षे अशी जखमी पर्यटकांची नावे आहेत. दरम्यान याचवेळी सोयगाव-हळदा रस्ता हा वेताळवाडी किल्ल्या लगत असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या मंडवे कुटुंबावर देखील हल्ला केला. यामध्ये भिकन मंडवे वय 45, अनिता मंडवे वय 38, प्रेरणा मंडवे वय 15 व अभिजित मंडवे वय 11 वर्षे सर्व रा. गलवाडा जखमी झाले आहेत. तसेच धावण्याचा सराव करण्यासाठी हळदाकडे धावत असताना प्रदीप जाधव नावाच्या तरुणाला देखील मधमाशांनी चावा घेतला.

तीन वेगळ्या-वेगळ्या घटनांमध्ये नागरिकांवर मधमाशांनी हल्या केल्यामुळे त्या परिसरात नागरिक जाण्यास घाबरत आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!