‘निवडणुकीसाठी बायको पाहिजे’ अशी बॅनरबाजी करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

150 0

औरंगाबाद- निवडणुकीसाठी बायको पाहिजे, अशी बॅनरबाजी करून औरंगाबाद शहरात खळबळ उडवणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश विनायक पाटील असं या तरुणाचं नाव आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांना तिसरे अपत्य झाले. कायद्याप्रमाणे तीन अपत्य झालेल्या व्यक्तीला महापालिका निवडणूक लढता येत नाही, मात्र ती लढवण्याची पाटील यांची खूप इच्छा असल्यामुळे त्यांनी औरंगाबाद शहरात निवडणुकीसाठी बायको पाहिजे अशी बॅनरबाजी करून खळबळ उडवून दिली.

या बॅनरबाजीचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या बॅनरवर शाई फेकून या वृत्तीचा जोरदार निषेध केला. तसेच महिला आयोगानेही या घटनेबाबत संबंधित तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक लढवण्यासाठी महिलांचा असा अपमान सहन करणार नाही, असे महिलांनी ठणकावून सांगितले. आता रमेश पाटीलच्या विरोधात औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Related Post

Dasara Melava

Dasara Melava : शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या आधी चार वक्त्यांची नावे जाहीर

Posted by - October 24, 2023 0
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळव्याच्या (Dasara Melava) माध्यमातून आज शिंदे गटाची तोफ धडाडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा मेळावा पार…

काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; सर गंगाराम रुग्णालयात उपचारार्थ दाखल

Posted by - March 3, 2023 0
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. जानेवारी महिन्यातच त्यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे आठ…

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केली हेल्पलाईन; माहिती पाठविण्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचं आवाहन 

Posted by - March 18, 2023 0
आवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवावी असं…

पुणे : कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Posted by - November 25, 2022 0
पुणे : कालव्यांच्या शेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा…

अजितदादा… 17 ठिकाणं… 12 तासांत 31 उद्घाटनं ! (व्हिडिओ )

Posted by - March 12, 2022 0
पुणे- सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून काल शुक्रवारीच अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला मात्र या सगळ्या धावपळीत या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *