कररचनेत बदल नाही… अर्थमंत्र्यांची घोषणा.. अशा आहेत केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

583 0

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज २०२२-२३ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. सर्वसामान्य करदात्यांसाठी मात्र या अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा करण्यात आली नसून जुनीच कररचना यंदा देखील लागू असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. काय आहेत यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी जाणून घेऊ या

बजेट एक नजर-

झिरो बजेट शेतीला प्राधान्य देणार

खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न

पायाभूत सुविधांसाठी २० हजार कोटींची तरतूद

पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंग प्रणाली

पोस्ट ऑफिस बँकांशी जोडणार

पैशांची देवाणघेवाण अधिक सोईची करणार

कृषी विद्यापीठांना प्रोत्साहन देणार

यापुढे चिप असलेले पासपोर्ट मिळणार

पुढील वर्षात ८ ठिकाणी रोप वे सुरु करणार

पेयजल योजनेसाठी ६० हजार कोटींची तरतूद

देशाचा विकासदर ९. २ टक्के असणार

LIC चा आयपीओ आणणारदेशात २५ हजार किलोमीटर मार्गांचे जाळे उभारणार

महिला सक्षमीकरणासाठी मिशन अंगणवाडी आणि मिशन शक्ती योजना

पिकांच्या संरक्षणासाठी ड्रोन वापरण्यास मुभा

यंदाच्या अर्थसंकल्पात पुढील २५ वर्षांची ब्लूप्रिंट

जमिनीची कागदपत्रे डिजिटल मिळणार

रेल्वे, रस्त्यांसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक

संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न

एकाच वेबसाइटवर उद्योगधंद्याचे सर्व परवाने मिळणार

इ वाहनांना बॅटरी बदलण्याची परवानगी देणार

कोळशापासून रसायन निर्मितीसाठी ४ पायलट प्रोजेक्ट सुरु करणार

कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देणार

टेलिकॉम क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार

तेलबिया निर्मितीला प्राधान्य देणार

९ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार

पाच नदीजोड प्रकल्पाचे डीपीआर तयार

सौरऊर्जेसाठी १९ हजार ५०० कोटीची तरतूद

१ ली ते १२ वी प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण पुरवणार

२०२२-२३ च्या दरम्यान आरबीआयचे डिजिटल चलन येणार

राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी १ लाख कोटींची तरतूद

राज्यांना सध्या मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त मिळणार अतिरिक्त निधी

विद्यार्थ्यांसाठी डिजिटल विद्यापीठाची उभारणी करणार

देशात मेट्रो ट्रेनचे जाळे उभारणार

सहकार क्षेत्रासाठी करामध्ये कपात

कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर

कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर

इन्कम टॅक्स रिटर्नमधील सुसुत्रीकरणासाठी २ वर्षांचा कालावधी

आयकर रचनेमध्ये मोठे बदल करणार

क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार

पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न करमुक्त

उद्योगांमधील सेस हा खर्च म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही

स्टार्टअप साठी २०२३ पर्यंत सवलत मिळणार

१ लाख ४० हजार कोटींचा जीएसटी जमा

आयकरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही

दिव्यांगांना करामध्ये सवलत मिळणार

सर्वसामान्यांना करामध्ये दिलासा नाही, जुनी कररचनाच चालू राहणार

कपडे चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार

छापा मारल्यास करचुकवेगिरी करणाऱ्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करणार

१ कोटी ऐवजी १० कोटी उत्पन्नावर कॉर्पोरेट टॅक्स लागणार

देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार

मोबाइल फोन, चार्जेर कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

संसदेचे अधिवेशन बुधवार दुपारपर्यंत स्थगित

 

 

Share This News

Related Post

Dhule Suicide

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Posted by - June 1, 2023 0
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नुकतीच पोलीस भरतीची परीक्षा दिलेल्या…

रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू – चित्रा वाघ

Posted by - June 11, 2022 0
पुणे- शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पुण्यात राजकारण तापले होते. भाजपच्या…

#Mental Health : नैराश्यामुळे उचलले जाते टोकाचे पाऊल; अशी ओळखा लक्षणे, आपल्या जवळच्या माणसाला मानसिक त्रासातून वाचावा

Posted by - March 27, 2023 0
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेहिने वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून सर्वांनाच धक्का बसला आहे.…

“…त्यांना टार्गेट करून निलंबन करण्यात आलं !” जयंत पाटील यांच्या निलंबनाबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाविरोधत विरोधक एकवटले. सरकार अन्याय करत असल्याची भावना आहे.…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; सुनील प्रभूंकडून कोर्टात याचिका दाखल

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे रविवारी राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *