BREAKING : पुण्यात शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला ; पोलिसांकडून सौम्य लाठीमार (VIDEO)

396 0

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर पुण्यात शिवसानिकांकडून हल्ला करण्यात आला. ते पुण्याहून मुंबईकडे निघाले असता हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळतेय. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली.

आज शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील कात्रज भागात त्यांची सभा सुरू असताना ही घटना घडली. यावेळी सामंत हे येथूनच जात असल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, चपलफेक केली यावेळी गद्दार..गद्दार, अशा घोषणा दिल्याचीही माहिती मिळतेय.

पुण्यातील कात्रज भागात उदय सामंत हे मुंबईच्या दिशेनं जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली आणि गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकल्या. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गद्दार, गद्दार असं म्हणत शिवसैनिकांनी उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला केला.

Share This News
error: Content is protected !!