आपल्या पृथ्वीच्या व्यतिरिक्त आकाशगंगेमध्ये असे अनेक ग्रह आहेत,ज्यावर मनुष्यासारखे जीव असल्याचा दावा शास्त्रज्ञ नेहमीच करत असतात. आत्तापर्यंत अनेक वेळा संशोधन झालं पण आता पुन्हा एकदा एलियन बाबतचे गुड वाढले आहे. त्यास कारण आहे की आकाशगंगेमध्ये एक चुंबक किंवा न्यूट्रॉन तारा आहे. या तार्यावरून 82 तासात तब्बल 863 रेडिओ सिग्नल आले आहेत. हे सिग्नल जेथून येत आहेत त्यास FRB 20201124A असं नाव देण्यात आल आहे.
A New FRB Signal Has Buzzed Nearly 2,000 Times in Just Two Months, Raising a Mystery https://t.co/y8rJQczJiI
— ScienceAlert (@ScienceAlert) September 24, 2022
चीनच्या फाईव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोपने हे सिग्नल कॅप्चर केले आहेत. चीनचे पेकिंग विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ हेंग शू या सिग्नल्सचा अभ्यास करत आहेत. अमेरिका आणि चीनचे शास्त्रज्ञ या सिग्नल्सवर एकत्रित अभ्यास करत असून, ज्या आकाशगंगेतून हे सिग्नल्स येत आहेत ती आकाशगंगा आपल्या आकाशगंगेशी साम्य ठेवते. असे देखील या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे एलियन खरंच आहेत का ? याविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.