अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरी खेळायला आलेल्या एका दोन वर्षाच्या चिमूरडीवर 65 वर्षीय आजोबांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भास्कर मोरे या ज्येष्ठास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या ज्येष्ठाविरुद्ध भादवि कलम 376, पास्को कायदा कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीरामपूर मधील एका गावात 18 फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळेत दोन वर्षीय चिमुकली शेजारच्या घरी खेळायला आली होती. या नराधम आजोबानेच या दोन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने ती सातत्याने रडत असल्याने आईला संशय आला. त्यानंतर तिच्या आईने आणि वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून नराधमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.