Garba

Garba : ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या’, विश्व हिंदू परिषदेची मागणी

1786 0

मुंबई : नागपूरसह राज्यभरात आता गरब्यावरुन (Garba) नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. प्रवेश देताना सर्वांचे आधार कार्ड तपासा, असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले. या मागणीला भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेच्या मागणीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गरबा कार्यक्रमात अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्याकडून करण्यात आले आहेत. विश्व हिंदु परिषदेच्या मागणीला नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे. दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही ते तपासा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. तसेच शिंदे गटाकडूनदेखील नितेश राणेंच्या मागणीचे समर्थन करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!