Garba

Garba : ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या’, विश्व हिंदू परिषदेची मागणी

1722 0

मुंबई : नागपूरसह राज्यभरात आता गरब्यावरुन (Garba) नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. प्रवेश देताना सर्वांचे आधार कार्ड तपासा, असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले. या मागणीला भाजप नेते नितेश राणे यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे आता विश्व हिंदू परिषदेच्या मागणीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गरबा कार्यक्रमात अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात असा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्याकडून करण्यात आले आहेत. विश्व हिंदु परिषदेच्या मागणीला नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे. दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही ते तपासा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. तसेच शिंदे गटाकडूनदेखील नितेश राणेंच्या मागणीचे समर्थन करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Ambadas Danve

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?

Posted by - June 19, 2023 0
मुंबई : मनिषा कायंदे (Manisha Kayande) या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार होत्या. त्यामुळे त्या आता शिंदेंच्या…

VIDEO : दहीहंडी हा खेळ क्रिडा प्रकारात समविष्ट करुन घेतला तर त्याला वेगळे प्रलय प्राप्त होईल – डॉ. श्रीकांत शिंदे

Posted by - August 16, 2022 0
धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच…

धक्कादायक : कोयता गॅंग मधील 7 अल्पवयीन मुलांची बाल निरीक्षण गृहात केली होती रवानगी; भिंतीला शिडी लावून असे झाले फरार

Posted by - January 31, 2023 0
पुणे : शहरातील कोयता गॅंग मधील सात अल्पवयीन मुलांची रवानगी येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालनिरीक्षणगृहामध्ये करण्यात आली होती.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *