पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, अजित पवार यांची घोषणा, असे असतील नियम

112 0

पुणे- येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. शाळा सुरू करण्यासाठीची काय नियमावली असेल याची माहिती शाळांना देण्यात येणार आहे. आजच हे आदेश काढण्यात येणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी सांगितले की, शाळा जरी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नसेल. पालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. एकदा घडी नीट बसली की मग याबाबत पुढचा निर्णय घेण्यात येईल. पहिली ते आठवी वर्गाची शाळा अर्धा दिवस असेल. दुपारच्या सुट्टीनंतर मुलांनी घरी जाऊन डबा खायचा आहे. तर, नववी इयत्तेपासून पुढच्या इयत्तांचे वर्ग पूर्णवेळ भरतील. असे अजित पवार यांनी सांगितले.

तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान 10 आणि 12 च्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून याबाबतचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी : विशाखापट्टणम आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची घोषणा

Posted by - January 31, 2023 0
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टनम हि आंध्र प्रदेशची राजधानी…
Rape

हिंजवडी आयटी पार्क हादरलं! नामांकित कंपनीतील सुपरवायझरने हेल्पर महिलेसोबत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

Posted by - June 15, 2023 0
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मारामाऱ्या, हत्या आणि लूटमार या घटना घडत असताना आता महिला…
Mumbai Crime News

Mumbai Crime News :काजलचे घराबाहेर सूत जुळलं अन् सासू-नवऱ्याचा केला गेम; पण…

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : आजकाल पैसा हाती आला कि रक्ताची नातीदेखील एकमेकांच्या जीवावर (Mumbai Crime News) उठतात. याच पैशांपायी गडचिरोलीमध्ये एका सुनेनं…
Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : “कोयता दाखवत फुकट चॉकलेट दे” म्हणणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी काढली धिंड

Posted by - July 20, 2023 0
पुणे : पुण्यात सध्या कोयता गॅंगचा (Pune Koyta Gang) सुळसुळाट सुरु आहे. विविध गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी हे कोयताधारी गुंड (Pune…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा

Posted by - June 12, 2022 0
पंतप्रधान  नरेंद्र मोदी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *