नंदूरबारमध्ये गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

543 0

नंदूरबार- नंदूरबार रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या गांधीधाम पुरी एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. ही घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले.

गांधीधाम-पुरी एक्सप्रेस नंदूरबार स्थानकात पोहोचण्यापूर्वीच या गाडीच्या पॅन्ट्री कारला भीषण आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात जेवण साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असते. त्या ठिकाणीच आगीने पेट घेतला. ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचली. धुराचे लोट डब्याबाहेर पडू लागले. त्यामुळे प्रवाशी प्रचंड हादरून गेले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी गाडीत सामान टाकून तात्काळ गाडीतून धाड धाड उड्या मारत स्वत:ची सुटका करून घेतली.

आग लागल्याची माहिती लक्षात येताच मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. रेल्वे प्रशासनाकडून आग लागलेल्या पॅन्ट्री बोगीला अन्य रेल्वे डब्यांपासून वेगळे करण्यात आले. प्रवासी डबे वेगळे करण्यात आल्याने अनर्थ टळला. ही आग नेमकी कशामुळे लागली ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अजूनही आग विझविण्याचे काम सुरू आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. या आगीत प्राथमिक माहितीनुसार कुठल्याही व्यक्ती जखमी झालेला नाही.

Share This News

Related Post

‘पुष्पा’ सिनेमाची प्रेरणा घेऊन अडीच कोटींचे रक्तचंदन स्मगल करणारा गजाआड (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022 0
मिरज- दक्षिणेतील पुष्‍पा चित्रपटामुळे सध्या देशभर रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेरणा घेऊन एका चोरट्याने तब्बल अडीच कोटींच्या…

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा वचननामा जाहीर; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपला वचननामा जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे पुन्हा वापस आणू,…

पोट धरून हसाल : लिंबूच मटन , धनंजय माने इथेच राहतात का ? हे डायलॉग कधीही न विसरणारे , पण यातला एक डायलॉग घेताना मामांकडून झाली होती ‘ही’ चूक तरीही ठरला सुपरहिट

Posted by - September 26, 2022 0
अशी ही बनवाबनवी यातले डायलॉगच काय , या चित्रपटाचं नाव जरी आज कुणी घेतलं तर एक नकळत हसू चेहऱ्यावर उमटून…

राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; मलीकांना डच्चू तर आव्हाडांचं ‘प्रमोशन’

Posted by - September 16, 2022 0
नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात काही नवीन चेहर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *