विमानाच्या पेट्रोलची चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले, पुण्यातील घटना

904 0

एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून विमानाला लागणाऱ्या पेट्रोलची चोरी करताना एका टोळीला रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईत चोरट्यांकडून एकून २४ हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सुनीलकुमार प्राणनाथ यादव, दाजीराम लक्ष्मण काळेल, सचिन रामदास तांबे, शास्त्री कवलु सरोज, सुनील रामदास तांबे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोरट्यांकडून एकून २४ हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील वाशी येथून विमानाला लागणारे पेट्रोल-डिझेल भरून टँकर शिर्डी विमानतळाकडे निघाला असल्याची माहिती हडपसर भागात गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली. इंधन कंपनीकडून टँकरच्या प्रवासाचा मार्ग ठरवण्यात आला. या सोबतच टँकरचा माग घेण्यासाठीची विशिष्ट यंत्रणा त्यात बसवण्यात आली होती. दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना टँकर मधील इंधनाची चोरी होत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांना याची माहिती देण्यात आली असता पोलिसांनी हडपसर परिसरात छापा टाकून टँकरमधून इंधनाची चोरी होत असतानाच आरोपींना अटक करण्यात आली.

Share This News
error: Content is protected !!