पुणे : वारजे माळवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार रवींद्र ढोले आणि त्याचा एक साथीदार प्रतीक दुसाने यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्हेगारांच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शरीरा आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. परिसरामध्ये खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्राद्वारे जखमी करणे, जिवे मारण्याचे धमकी देणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, पोलिसांचे आदेशाचा भंग करणे, चोरी करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे आणि समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समोर उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना निर्देश दिले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सण 2022 या चालू वर्षी येतील 44 वी आणि एकूण 107 वी कारवाई आहे.