Breaking News ! आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्यावर कारवाईचे आदेश

486 0

मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीनचिट देण्यात आल्यानंतर या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. आता या प्रकरणात आर्यन खान याला आरोपी करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

या प्रकरणी एनसीबीने विशेष न्यायालयात आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा एनसीबीने पर्दाफाश केला. याच क्रूझवरुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले. या प्रकरणी एनसीबीने एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आर्यन खान याला क्लीनचिट दिल्यामुळे या छाप्याच्या वेळी उपस्थित असलेले अधिकारी समीर वानखेडे यांची भूमिका वादात सापडली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या विशेष तपास पथकाला क्रूझवर टाकलेल्या छाप्याच्या कारवाईत अनेक अनियमितता असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी देखील एसआयटीच्या चौकशी अहवालात मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सध्या वानखेडे यांची एनसीबीमधून त्यांचे मूळ केदार असलेल्या डीआरआय मध्ये करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं.

Share This News

Related Post

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक; आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

Posted by - December 28, 2022 0
पुणे : परदेशात वाढणारी कोविड-१९ रुग्णांची संख्या लक्षात घेता या साथरोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला…

पठाणचा बिकनी वाद : सेन्सर बोर्डाने सांगितले ‘हे’ बदल; दीपिकाच्या बिकनीचा रंग बदलणार का ?

Posted by - December 29, 2022 0
मुंबई : चार वर्षानंतर कमबॅक करताना शाहरुख खान आपल्या पठाण चित्रपटांमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहू नये याची चांगलीच काळजी घेत…

अहमदनगरमध्येही राज ठाकरेंचे जंगी स्वागत! राज ठाकरे यांनी घेतले शाकाहारी जेवण

Posted by - April 30, 2022 0
अहमदनगर- औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना झाले. राज ठाकरे यांचे अहमदनगरमध्येही जोरदार स्वागत करण्यात आले. वाटेत पुण्याहून…
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 1 ठार 3 जण जखमी

Posted by - November 12, 2023 0
वाशिम : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) होणारे अपघात काही थांबायचे नाव घेईना. ऐन दिवाळीच्या तोंडावर शनिवारी मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून…
Prakash Ambedkar

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Posted by - April 21, 2024 0
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) राज्यात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत होणार आहे. मात्र वंचितने स्वतंत्र निवडणूक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *